कसाबला फाशीपर्यंत पोचवणारे, उज्वल निकम भाजपचे उमेदवार
मुंबई,२७ एप्रिल २०२४: मुंबईवर हल्ला करून शेकडो नागरिकांचा प्राण घेणाऱ्या अजमल कसाब या आतंकवाद्याला फाशीच्या फांद्यापर्यंत पोहोचविणारे सरकारी वकील उज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे त्यांची लढत काँग्रेसचे माजी मंत्री वर्ष गायकवाड यांच्यासोबत होणार आहे.
महाविकास आघाडीने जरी आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी या मतदारसंघात महायुतीकडून कोणालाही उमेदवारी जाहीर केली गेलेली नव्हती. या मतदारासंघासाठी मोठा महायुतीत मोठा खल झाला होता. त्यात विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन या सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. मात्र, आता भाजपाने या मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करत थेट ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांनाच मैदानात उतरवलं आहे.
राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आता राजकारणात प्रवेश करण्याची चर्चा सध्या सुरू झालीये.
या चर्चेचं कारण म्हणजे शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (१० जुलै) उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. याच भेटीनंतर ते शिवसेनेत जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.