साताऱ्यात उदयनराजे भोसले बंडखोरीच्या तयारीत?
सातारा, १५ मार्च २०२४: भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारर जाहीर झाले. पण यामध्ये सातारा येथून खादार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर न झाल्याने ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी राजवाड्यावर गर्दी करत स्वबळावर लढा अशी मागणी केली आहे.
भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत हीना गावित, स्मिता वाघ, रक्षा खडसे यांच्यापासून ते पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांची नावे आहेत. सुजय विखे पाटील यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. पण या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. पण सातारा हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असं असतानाही साताऱ्याची सीट जाहीर न केल्याने उदयनराजे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. या समर्थकांनी साताऱ्यातील शिवतीर्थावर जमून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात 20 जणांना तिकीट देण्यात आलं आहे. राज्यातील या पहिल्या यादीत नव्या आणि जुन्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट जाहीर न केल्याने मराठा समाज प्रचंड नाराज झाला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.
साताऱ्याच्या पोवई नाका येथील शीवतीर्थावर मराठा समाज एकवटला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर या कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाने घोषणा दिल्या. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. उमेदवारी मिळत नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
राजीनामे तयार भाजपच्या यादीत उदयनराजे भोसले यांचं नाव न आल्याने कार्यकर्त्यांनी काल रात्रीच राजीनामे तयार केले आहेत. पुढील काळात उदयनराजे यांचं नाव जाहीर न झाल्यास आम्ही पदांचे राजीनामे देऊ, असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे. उमेदवारी जाहीर न झाल्यास उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.