उदय सामतांनी रोहित पवारांना ठेवले पाच तास ताटकळत

मुंबई, २५ जुलै २०२३ : कर्जत जामखेड चा एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी भर पावसात आंदोलन केले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल अशी आश्वासन उद्योग मंत्री उदय सावंत यांनी केली दिले होते. त्यानुसार आज बैठक बोलण्यात आली होती. दुपारी एकची बैठक असताना सायंकाळी सहा वाजून गेले तरी सामंत यांचा पत्ता नव्हता. अखेर बैठक रद्द झाली.

कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी व्हावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी लावून धरली आहे. यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. पण एमआयडीसीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ती होऊ नये यासाठी राजकीय कोंडी करण्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या मुद्यावरून रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले. भर पावसात ते उपोषणाला बसले होते. मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे यांनी हे रोहित पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपोषणावरून रोहित पवार यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

 

अखेर या एमआयडीसीबाबत उद्योग विभागाची बैठक बोलवली. या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानुसार आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीचे अधिकारी यांची विधिमंडळाच्या समिती कक्षात बैठक बोलवण्यात आली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास आमदार रोहित पवार आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उद्योगमंत्री आता येतील, थोड्या वेळात येतील असे बैठकीत सांगण्यात आले. सुमारे पाच तास अधिकारी आणि रोहित पवार हे मंत्र्यांची वाट पहाट होते. पण मंत्री आले नाहीत. शेवटी उद्योगमंत्री यांच्या कडून बैठक रद्द करण्यात आले.

 

सुमारे पाच तास रोहित पवार हे मंत्र्यांची वाट बघत ताटकळत बसले होते. ही बैठक राजकीय हेतूने रद्द करण्यात आल्याची एक बाजू पुढे आली. तर परकीय गुंतवुणूकीबाबत एक महत्त्वाचा विषय असल्याने ही बैठक होऊ शकली नाही, अशी माहीती उद्योग विभागाकडून मिळाली. आज बैठक झाली नाही, तर आमरण उपोषण करेल अस इशारा रोहित पवार यांनी दिला होता. आज ही बैठक पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले. नक्की ही बैठक कधी होते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आता पवार आता काय भूमिका घेतील हे देखील पाहणे महत्चाचे आहे.