कार्यकर्त्यांची इच्छा स्वाभाविक पण मुख्यमंत्री हायकमांडच ठरवणार – नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
मुंबई, २५ मे २०२३: डोंबिवली येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावण्यात आले त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झालेली असताना त्यावर पटोळे यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसचाही मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण, कार्यकर्त्यांना सांगू की, अशी चूक पुन्हा करू नका. कारण, हा अधिकार हायकमांडला आहे,” असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस महाविकासागर जागावाटप लोकसभा विधानसभा निवडणुकीची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढणे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या फक्त बाबत भाष्य केले
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी “ “नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात. नागपुरात त्यांनी म्हटलं, काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार. महाविकास आघाडीत बसलं की म्हणतात आम्ही एकत्र लढणार. त्यामुळे हा फसवण्याचा जो भाग आहे, त्याचं टार्गेट कोण आहे, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं”, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
याबद्दल नाना पटोले यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर पटोले म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेथील नेत्यांशी चर्चा करून स्वतंत्र लढणार, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल आम्ही भूमिका मांडली नाही. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा करणं योग्य नाही.”
डोंबिवलीत नाना पटोले यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स लागले आहेत. याबाबत विचारल्यावर नाना पटोलेंनी सांगितलं, “काँग्रेसची ही प्रथा आणि परंपरा नाही. विधानसभा निवडणुकीनंतर जे काही निकाल येतील, त्या आधारावर मुख्यमंत्री निश्चित होईल. महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून एक नवीन वातावरण तयार झालं आहे. एका पक्षात तीन-तीन मुख्यमंत्री करून टाकले आहेत.”
“काँग्रेसचाही मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण, कार्यकर्त्यांना सांगू की, अशी चूक पुन्हा करू नका. कारण, हा अधिकार हायकमांडला आहे,” असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप