सुप्रिया सुळेंच आयुष्य दादा, दादा करत आयुष्य गेलं – तटकरेंचा घणाघात

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३: काँग्रेस पार्टी कुणाचा याची निवडणूक आयोगासमोर लढा सुरू असतांना अजित पवार गटाचे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीनिवास पाटील यांच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करून सुप्रिया सुळे लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे तटकरे म्हणाले. दादा… दादा… करत ज्यांचं आयुष्य गेलं, त्यांनी राजकीय विचारधारा भिन्न असल्याचं सुचतं आणि मग त्या अजित पवारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करतात, असा शब्दात सुप्रिया सुळेंवर टीका केली.

काल सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली की, श्रीनिवास पाटील ८३ वर्षांचे आहेत. त्यांच्याविरोधात विरोधात याचिका दाखल केली. यावर सुळेंनी आक्षेप घेतला. त्याला आता तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. तटकरेंनी आज निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू होण्याआधी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात अपात्रतेची कोणतीही याचिका दाखल केली नाही. कारण शरद पवार हे आमचे दैवत आहेत.
ते म्हणाले, अजित पवारांनी बारामती शहर ३० वर्षे उभं केलं. दादा…दादा…दादा बोलत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. त्यांनी अजित पवारांना अपात्र करण्यासाठी त्यांच्या विरोधात याचिक दाखल केली. तेव्हा त्या सांगतात की, राजकीय विचारधारा भिन्न असल्यानं आम्ही हा निर्णय घेतला… मला श्रीनिवास पाटलांबद्दल आदर आहे. ते आमच्या सर्वांसाठी पितृतुल्य आहेत. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा मुद्दा नाही, ८३ र्षाचे सतत बोलून किती केविलवाणी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, असा सवालही श्रीनिवास पाटलांवरून सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंना विचारला.

शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बोलताना तटकरे म्हणाले की, अविश्वास ठराव मंजूर होण्यापूर्वी पडद्याआड अनेक घडामोडी घडल्या. याबाबत जयंत पाटील यांना विचारा, अन्यथा योग्य वेळे आल्यावर भाष्य करणार. लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान मतदान झाले नाही. व्हीपचे उल्लंघन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे तटकरे म्हणाले.