सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय नाना दांगटांची भाजपसोबत सलगी, राष्ट्रवादी काँग्रेस मधून हाकालपट्टी

पुणे, २५ एप्रिल २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू कार्यकर्ते उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास नाना दांगट यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या (हवेली) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत भाजपला मदत करत असल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हाकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अनेक वर्षानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे यामध्ये भाजपने प्रदीप कंद यांच्या माध्यमातून जोर लावलेला आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची मोट बांधून ही निवडणूक जिंकण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. त्यामध्ये विकास नाना दांगट यांना मदत करत होते. त्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या.

गारटकर म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष या नात्याने दांगट यांनी हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हवेली तालुक्यात ग्रामपंचायत आणि सोसायटी विभागात प्राबल्य असून ही निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासाठी अत्यंत सोपी होती.असे असताना आणि त्यांच्याकडे पक्षाच्या पॅनलबाबत सातत्याने विचारणा करत असताना त्यांनी असा पक्षाला सोडून का निर्णय घेतला. याचा विचार केला असता, त्यांची भाजपशी जवळीक झाल्याचे लक्षात आले. अजित पवार यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता.

त्यांच्या आदेशानुसार मी अनेकवेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. परंतु, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले असल्याचे गारटकर यांनी सांगितले.एक वर्षापुर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के आणि दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघे राष्ट्रवादीचे परंतु त्यांच्यात एकमत होत नसल्याच्या कारणावरुन शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता.त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक मान्यवरांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवलेली दिसत नाही.अजित पवार यांच्याविषयी चुकीच्या बातम्या पेरल्यामागील दोन महिने अजितदादांविषयी चुकीच्या बातम्या पेरुण सर्वांची दिशाभुल करण्याचे काम दांगट यांनी सातत्याने केले असल्याचा आरोपही गारटकर यांनी यावेळी केला.पक्षविरोधी कारवायांबद्दल विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी करीत आहे. हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करत आहेत. त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल. शरद पवार यांच्या जिल्ह्यात पक्षाच्या अधिकृत पॅनल विरोधात जाऊन पक्षालाच आव्हान देण्याची भूमिका अंत्यत चुकीची आहे. पक्षाची शिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे, प्रदिप गारटकर यांनी सांगितले.