‘समर्थक आमदारांबाबत संभ्रम ठेवायचाय असं समजा!
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३: माझ्या समर्थक आमदारांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तुमचे पाठीराखे नेमके किती त्याचा आकडा समजत नाही, संभ्रम आहे असा प्रश्न विचारताच “याबद्दल मी संभ्रम कायम ठेवू इच्छितो असे समजा,” असे उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्वाक्षरी करून निघून जातात हे अमान्य करत त्यांनी या अधिवेशनाला ८५ टक्के आमदार उपस्थित होते असे उत्तर दिले. विरोधी पक्षांतील २५ आमदारांना निधी मिळाला नसावा अशी शंका आहे. मात्रआता कामकाज संपल्यानंतर हा आकडा काढून त्याबद्दल निश्चित माहिती काढू.
९० आमदारांना निधी मिळाला नाही ही माहिती चूक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर विरोधी पक्षनेत्यांनी मान्य केले असल्याचेही ते म्हणाले. राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
आपल्याच राज्याची बदनामी : मुख्यमंत्री
प्रकल्प राज्याबाहेर गेले नाहीत, कारण ते येथे आलेच नव्हते, हे आता तारीखवार सिद्ध झाले आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलेच राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, असा हल्ला विरोधकांवर चढवला.
‘स्टुडिओबाबत सकारात्मक’
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनंतर प्राप्त झालेल्या रेकॉर्ड तपासून घेतल्या जात आहेत. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच स्टुडिओ अधिग्रहीत करण्याबद्दल सरकार सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप