सुळे, बारणे, मोहोळे, कोल्हे यांची विजयाचेया दिशेने घोडदौड

पुणे, ४ जून २०२४ : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी दोन जागा महायुतीच्या पाड्यात टाकल्या तर दोन जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे अमोल कोल्हे मुरलीधर मोहोळ आणि श्रीरंग बारणे यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झालेली आहे.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदाम येथे सुरू आहे. मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथे तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव येथे सुरू आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी पुण्यातील चार सभा लोकसभा मतदारसंघात भाजपला एक आणि शिंदे यांच्या शिवसेनेला एक अशा दोन जागा दिलेले आहेत. तर अजित पवार यांना मात्र मतदारांनी नाकारलेले आहे. बारामती येथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पराभवाच्या छायेत असून सुप्रिया सुळे हे या पन्नास हजारापेक्षा जास्त मताने आघाडीवर आहेत. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे 55000 आणि आघाडीवर आहेत या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्याकडे आलेले शिवाजीराव पाटील यांची पुन्हा एकदा परवाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केलेला होता.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांचा थेट लढत होती यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे 50000 पेक्षा जास्त मताने आघाडीवर आहेत या ठिकाणी ठाकरे संजोग वाघेरे हे पराभवाच्या दिशेने जात आहेत.