शरद पवार गटांचे राज्यव्यापी शिबीर शिर्डीत
शिर्डी, १९ सप्टेंबर २०२३ : जनतेतून शरद पवार यांच्या सभांना मोठा प्रतिसाददेखील मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राज्यव्यापी कार्यकर्ता शिबिर पुढील ऑक्टोबर महिन्यात शिर्डी येथे आयोजित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नगर येथील पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना फाळके यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर जिल्हा पातळीवर पहिलीच बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा कार्यकारिणीतील ९० पैकी ६० सदस्य उपस्थित होते. गैरहजर कार्यकारिणी सदस्य-पदाधिकाऱ्यांबद्दल फाळके यांनी काही सदस्य अनुपस्थित होते. त्यांच्या जागी आम्ही नव्याने नियुक्ती करणार असल्याचे स्पष्ट केले.
२०१ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते. त्यापैकी प्राजक्ता तनपुरे, रोहित पवार हे दोन आमदार पक्ष फुटीनंतर शरद पवार गटासोबत राहिले, तर नीलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे हे चार आमदार अजित पवार गटासोबत गेले आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप