बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा
मुंबई दि. ३० मार्च २०२४- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती.
आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.