शिंदे, फडणवीस, पवार काढणार भुजबळांची समजूत
कोल्हापुर, २९ जानेवारी २०२४ : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर मार्ग काढल्यानमतर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज अजित कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची भूमिका दोन दिवसांपूर्वीच प्रफुल पटेल यांनी जाहीर केली आहे. आपल्याला कोणत्याही समाजाला नाराज करुन चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे एकत्र बसून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजितदादा देखील मंत्री छगन भुजबळ यांची समजूत काढणार आहेत. आपला हेतू हा कोणत्याही समाजाला दुखावण्याचा नसल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजितदादा देखील मंत्री छगन भुजबळ यांची समजूत काढणार आहेत. आपला हेतू हा कोणत्याही समाजाला दुखावण्याचा नसल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. नोंदणीकृत मराठा समाजाला कुनबी प्रमाणपत्र मिळणे कायदेशीर होते. काही नेत्यांची वैयक्तिक भूमिका यावर वेगळी असू शकते, असेही यावेळी सांगितले.