शरद पवारांचा मतावर डोळा, जरांगेंना दिला खुला पाठिंबा

मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ ः राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचं चित्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. तर बाजूलाच आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषण करत आहेत. दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्यामुळे काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, जालनासह काही जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य करून जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. आगमी विधानसभा निवडणुकीत मराठा मतांवर डोळा ठेवून पवार यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. कारण आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचा आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंज्यस्य कसं राहील, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतलं पाहीजे. तसंच वातावरण चांगलं कसं राहिल, याचीही खबरदारी घेतली गेली पाहीजे.

पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणाले राजे होते. त्याच गोष्टीचा मराठा समाजाने आदर्श घेतलेला आहे. आज राज्यात मराठा समाज सर्वांना घेऊन चालतो. मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे. त्यामध्य सर्वांचा विचार करण महत्वाचं असं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर आज राज्यात आरक्षणाबाबत जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर सरकारने तोडगा काढावा असंही ते म्हणाले आहेत.