संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार बोलले
दिल्ली, २३/०८/२०२२: ‘केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खासदार संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून त्यांना अटक केले,’ असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राऊत यांना करोना काळात औषधांसाठी किती खर्च केला असे प्रश्न विचारले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
पवार म्हणाले, ‘सामनाचे संपादक संजय राऊत खासदार आहेत मागील तीन-चार आठवड्यांपासून त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले, का अटक केले? नबाव मलिक जसे सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर ठेवत होते . वर्तमानपत्रात लिहीत होते. दरम्यान, आम्हाला माहिती मिळाली की, त्यांना एवढंच विचारलं जातं की, मुंबई शहरात करोना काळात जी औषधे घेतली त्यासाठी किती खर्च झाला? संजय राऊत म्हणाले, मी संपादक आहे, तेथे किती खर्च झाला हे डॉक्टरला विचारा, रुग्णालयाला विचारा. मला का विचारता?’, अशी माहिती पवारांनी दिली.