शरद पवार गटाला मिळणार नवे नाव आणि चिन्ह

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. आयोगाने शरद पवार सूचना दिल्या आहेत की ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही चार नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने आजची मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाकडून पक्षचिन्ह आणि नाव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाने पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद पवार स्वाभिमानी पक्ष ही नावे देण्यात आली आहेत. तसेच चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य ही चिन्हे देण्यात आली आहेत.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (७ फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार यांना जोरदार धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत शरद पवार गटाने पुढील कार्यवाहीस सुरूवात केली आहे. आज दुपारपर्यंत पक्षचिन्ह आणि नाव आयोगाला द्यावे लागणार आहे.