उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचाताना पाहून वाईट वाटल: अमित शहांवर टिका केल्याने फडणवीसांचे उत्तर
अमरावती, ३ ऑगस्ट २०२४: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी ठाकरेंनी केली. त्या टीकेला आता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिंरजीव उद्धव ठाकरेंना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतांना पाहिलं, तेव्हा मनाला खूप दु:ख झालं, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली.
आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मला एका गोष्टीचे खरंच आश्चर्य वाटते. पक्ष फुटतात, पक्ष एकमेकांबरोबर राहत नाहीत. पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं, ते हिदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतांना पाहिलं, तेव्हा मला मनापासून दु:ख झालं. आता या ठिकाणी कुणाकडून अपेक्षा करावी? असा सवाल फडणवीसांनी केला. ते म्हणाले, आमचा विरोध कोणत्याही जाती धर्माला नाही. आमचं म्हणणं इतकचं आहे की, लांगुलचालन चालणार नाही. पण एखाद्या विशिष्ट वर्गाला हाताशी धरून त्यांच्या बळावर आम्ही निवडणून येऊ असं कुणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार की नाही? असंही फडणवीस म्हणाले.
खोटं बोलल्याशिवाय विरोधकांना जेवणही जात नाही
महाराष्ट्रात आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती. चार पक्षांशी होती. चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. केवळ दोन लाख मतांनी त्यांचे ३० खासदार होते आणि आपले १७ खासदार होते. ४०० पार संविधान बदलण्यासाठी आहे, हा खोटा समज विरोधकांनी पसरला. रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे विरोधकांच काम आहे. रोज रोज खोटं बोललं की, ते लोक खरं मानू लागतात. हे लोक इतके निर्लज्ज आहेत की, खोटे बोलल्याशिवाय त्यांना नाश्ता आणि रात्रीचे जेवणही घशाखाली जात नाही.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप