रोड शो फक्त गुजराती परिसरात, अन्य भागात मोदी का गेले नाही? शरद पवारांची टीका
नाशिक, १६ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शो झाला. यावरूनच शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. पवार म्हणाले की, मोदींनी हा कार्यक्रम ज्या भागामध्ये घेतला तो केवळ गुजराती लोकांचा भाग होता. पवार हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, मुंबईसारख्या शहरांमध्ये रोडशो आयोजित करणं हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यामुळे लोकांना तासातच थांबावं लागतं. ट्रॅफिकच्या समस्या निर्माण होतात. तसेच मोदींनी हा कार्यक्रम ज्या भागामध्ये घेतला. तो केवळ गुजराती लोकांचा भाग होता. रोड शो घेण्यासाठी मुंबईमध्ये इतरही भाग होता. मात्र त्यांचं लक्ष केवळ एका विशिष्ट वर्गाकडे होतं. त्यामुळे या रोड शोचा लोकांना त्रास झाला. लोकांनी त्याच्या तक्रार देखील केल्या. असं म्हणत पवार यांनी मोदींच्या रोड शोवर टीका केली.
त्याचबरोबर मोदी यांच्या नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना या टीकेला देखील उत्तर दिलं. ते म्हणाले की, मोदी यांच्याकडे बोलायला कोणताही विषय नाही त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करतात. तसेच काल नाशिकमध्ये मोदी यांच्यासभेत तरूणांनी उठलेला कांदा प्रश्न हा हे दाखवून देत आहे की, नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यात जनमत हे भाजपसोबत नाही. असं म्हणत पवारांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
या अगोदर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक ट्वीट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोड शोचाच आग्रह केल्याचा टोला राष्ट्रवादीने महायुतीला लगावला होता. तर विजय विजय वडेट्टीवार यांनीही एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, मुंबईमधील होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. अशी टीका केली होती.