नाना पटोले यांच्या विरोधात पुन्हा दिल्लीत खलबते; अशोक चव्हाण यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट
नवी दिल्ली ६ जून २०२३: कर्नाटक विधानसभा मतदारसंघातील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला असताना महाराष्ट्रात मात्र अंतर्गत गटबाजी कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या आठवड्यात नाना पटोले यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्यानंतर देखील त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवले होते. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन खर्गे यांची भेट घेऊन त्यांच्यावर काम भरण्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे उपद्रमूल्य कमी झाले होते. त्यामागे पक्षातील नेत्यांना आलेली मरगळ हे महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे तरुण दमाचा प्रदेशाध्यक्ष द्यावा म्हणून नाना पाटोले यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होऊन देखील राज्यात काहीही फरक पडलेला नाही. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नाना पटोले यांची बाजू भक्कम झाली असे मानले जात असले तरी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांमध्ये अद्याप समन्वय निर्माण झालेल्या नाही. प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघाचा व जिल्ह्याची सुभेदारी राखण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे भाजप सारख्या विरोधकापुढे एक कणखर नेता सापडणे अशक्य झालेले आहे. नाना पटोले यांना प्रदर्शक अध्यक्ष पदावरून हटवून त्या ठिकाणी दुसऱ्या नेत्याची निवड करावी यासाठी केल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप त्यास यश आलेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मल्लिकार्जुन खर्गे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत नेते सक्रिय झाल्याचे चर्चा आहे. दरम्यान या संदर्भात अशोक चव्हाण यांनी वीट करून मल्लिकार्जुन खरेदी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली असे स्पष्ट केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जूनजी खरगे यांची आज नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. २०२४ मधील लोकसभा निवडणूक, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती व सध्याच्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली, असे ट्विट चव्हाण यांनी केले आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप