राजीनामा फेटाळला; शरद पवारच अध्यक्ष

मुंबई, ५ मे २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. पवार यांनी राजीनामा मागे घेणार नाही असे स्पष्ट सांगिकले होते. मात्र आता त्यांचा राजीनामा प्रकरण केल्याचे वादळ ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीने पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या वायबी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने जमा झाले असून कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. येथे एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे.

लोक माझे संगती शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात पवार यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राजीनामा देत असल्याचे जाहीर करून टाकले. यानंतर देशभरातील राजकारणात एकच उडाली आणि शरद पवार निवृत्त होणार अशा अफवांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ झाले. अनेकांना अश्रू रोखता आले नाहीत. त्या सर्व गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा अजित पवार हे दोघे असतील अशी चर्चा सुरू झालेली असताना अनेक वरिष्ठ नेत्यांनी मात्र शरद पवार हेच अध्यक्ष असले पाहिजेत तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही असे सांगितले. तरीही पवार हे त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते अखेर यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची एक समिती गठित केलेली असून ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीचा अहवाल का येणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच शरद पवार यांनी बुधवारी समिती जवळ निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल असे जाहीर केले. त्यामुळे समितीने शरद पवार हेच अध्यक्ष असले पाहिजे असा निर्णय घेतल्यास शरद पवारांचा राजीनामा हे पहिल्यातील वादळ ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईतील वाय बी सेंटर मध्ये आज राष्ट्रवादीच्या समितीचे बैठक झाली यामध्ये पवार यांचा राजीनामा फेकण्यात आलेला आहे त्यामुळे इकडे अजित पवार यांनी राजीनामाचे समर्थन केलेले असताना मात्र त्यांना या समितीने दणका दिला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप