शिवडी, पंढरपूरमधून राज ठाकरे यांनी जाहीर केले मनसेचे उमेदवार

सोलापूर, ५ ऑगस्ट २०२४ ः आगामी विधानसभेसाठी राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढण्याचं भाष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. एकीकडे मविआ आणि महायुतीत जागावाटपांच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच राज ठाकरेंनी विधानसभेसाठी शिलेदार मैदानात उतरवण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राज ठाकरेंनी दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वाचा असणारा शिवडी मतदारसंघ काबीज करण्यासाठी हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. या मतदारसंघातून मनसेकडून राज यांचा हुकमी एका म्हणून ओळख असलेल्या बाळा नांदगावकर यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. सध्या या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत.

अजय चौधरी हे २०१४ आणि २०१४ असे दोनवेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये अजय चौधरींनी नांदगावकरांचा तर, २०१९ मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडेंचा पराभव केला आहे. त्यामुळे यावेळी चौधरी हॅटट्रिक करणार की राज ठाकरेंचे शिलेदार नांदगावकर बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकेकाळी बाळा नांदगावकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. मात्र, त्यानंतर त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मनसेचा झेंडा हाती घेतला. उद्धव ठाकरेंसोबत असताना नांदगावकर मांझगाव मतदारसंघातून १९९५ ते २००४ असे सगल तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २००९ मध्ये नांदगांवकर मनसेच्या तिकीटावरून शिवडी विधानसभेच्या मैदानात उतरत आमदार झाल होते. नांदगावकर यांनी आतापर्यंत मनसेमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप