पुणे: संजय राऊतांचे भाजपला चॅलेंज- “ईशान्य मुंबईतून निवडणूक लढणार”

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३:  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपला थेट चॅलेंज दिले असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राऊतांनी त्यांच्या मतदार संघाचं नाव घेत एकप्रकारे घोषणाच केली आहे. शिवसेना-भाजपची युती असल्यापासून भाजपकडे असणाऱ्या ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी राऊतांनी रणनीती आखण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकाचं काय आम्ही तुरूंगातही जातो असेही विधान राऊतांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राऊत म्हणाले की, पक्षाने आदेश दिला तर आम्ही तुरुंगात जातो असे सांगत पक्षाने आदेश दिला तर आम्ही काहीही करू असेही राऊत म्हणाले. आम्ही आदेश मानणारे आहोत आमचं कुटुंबीय सुद्धा आदेश मानतं. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या एक साधा शिवसैनिक जरी उभा रहिला तरी, तो दोन ते सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, असा विश्वासदेखील राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्याविरोधात उतरणार मैदानात

राऊतांनी ज्या ईशान्य मुंबईचा उल्लेख बोलताना केला आहे. तेथे सध्या भाजपचे खासदार मनोज कोटक खासदार असून, आता राऊत थेट भाजपच्या बालेकिल्ला असणाऱ्या ईशान्य मुंबईतून मैदानात उतरत चॅलेंज देणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपचा खासदार हा शिवसेनेच्या मदतीनेच निवडून आले आहेत. त्यामुळे आमचा कार्यकर्ता पदाधिकारी जरी उभा रहिला तरी जिंकून येईल.

भाजपची डोकेदुखी वाढणार?
राऊतांच्या या विधानामुळे एकीकडे विविध चर्चांना पेव फुटले असून, दुसरीकडे ईशान्य मुंबईतून भाजपचे माजी खासादर किरीट सोमय्यादेखील यावेळी लोकसभेाठी भाजपकडून उमेदवारी मागू शकतात. त्यामुळे सध्याचे विद्यामान खासदार मनोज कोटक यांना तिकीट द्यायचे की माजी खासदार सोमय्यांना उमेदवारी द्यायची असा पेज भाजप समोर उभा राहणार आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकराता येत नाही.

2019 मध्ये भाजप नेतृत्त्वाने उद्धव ठाकरे यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून किरीट सोमय्या यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी द्यायची नाही, अशी अट घातली होती. त्यानंतर भाजपकडून सोमय्यांऐवजी कोटक यांना ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. येथे त्यांनी विजयाची पताकादेखील रोवली. परंतु ठाकरे आणि भाजपमधील सध्याचा दुरावा पाहता सोमय्या पुन्हा एकदा याच मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करू शकतात. तसे घडल्यास लोकसभा निवडणुकीवेळी ईशान्य मुंबई मतदारसंघात संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप