पुणे: पुनीत बालन यांना सव्वा तीन कोटींचा दंड महापालिकेचा दणका

पुणे, ३ ऑक्टोबर २०२३: दहीहंडीच्या काळात ऑक्सिरीच पाण्याच्या बाटलीचे ब्रँडची जाहिरात संपूर्ण करत विद्रूपीकरण करण्यात आलेले होते. यासाठी महापालिकेकडून कोणतेही परवानगी घेण्यास उद्योगपती पुणे बालन यांनी दुर्लक्ष केल्याने महापालिकेने त्यांना तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील दहीहंडी मंडळ गणेशोत्सव मंडळांना पुणे बालम यांच्यातर्फे आर्थिक मदत केली जात आहे. त्या बदल्यात ते मंडळाच्या परिसरात पुनीत बालन ग्रुपच्या ऑक्सिरिच या पाण्याच्या बाटलीचे ब्रँडिंग करून घेतात. हे प्रमाण प्रचंड असून प्रत्येक रस्ता चौक या ठिकाणी याच जाहिराती दिसतात.

त्याचप्रमाणे शनिवारवाड्याच्या परिसरात बुरूज दिसणार नाहीत या पद्धतीने मोठ्या मोठ्या होर्डिंग लावून विद्रूपीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकारावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. त्याचप्रमाणे सोशल मीडियात देखील बालन यांच्याविरुद्ध पोस्ट टाकून नागरिकांनी त्यांच्या संतापाला वाट मोकळे करून दिलेली होती. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी केलेले होत्या त्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाईसाठी पाऊल उचलले आहे.

राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या काळातील जाहिरात मांडव यावरील शुल्क माफ केले असल्याने त्या काळात जाहिरात करणार कोणतीही बंधन नव्हते. मात्र दहीहंडी उत्सवासाठी परवानगी घेणे आवश्यक होते दहीहंडी च्या म्हणजे ७ सप्टेंबर पासून ते १७ सप्टेंबर पर्यंत शहरातील रस्त्यांवर पुण्यात पालन यांच्या कंपनीचे अडीच हजार फ्लेक्स लावलेले होते. प्रत्येक फलकाची साईज ही किमान चार बाय आठ इतकी होती. या प्रत्येक बोर्डाला प्रतिदिन ४० रुपये इतके शुल्क होते याचा सर्व विचार करता महापालिका प्रशासनाने तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड पुनीत बालन यांना ठोकलेला आहे.

पुनीत बालन यांना ही रक्कम दोन दिवसात भरावी लागणार असून ही रक्कम न भरल्यास त्यांच्या मिळकतकरातून ही रक्कम वसूल केली जाईल असा इशाराही महापालिकेने दिलेला आहे.

आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत.