पुणे: शरद पवारांना पाठ दाखवून दादा मागच्या मागे सटकले

पुणे, १ ऑगस्ट २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना आज टिळक गौरव पुरस्काराने सन्मानाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर
आले. पण अजित पवार यांनी शरद पवार यांनी काका शरद पवार यांची भेट होऊ नये, नजरा नजर होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली. शरद पवार यांच्या पाठीमागून सटकल्याने त्यांची भेट झाली नाही. तर मोदी यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात भेटून चर्चा केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने याची खमंग चर्चा रंगली आहे.

आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देईन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र अनेक प्रसंगांची जोरदार चर्चा आहे. त्यातलाच एक किस्सा म्हणजे शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. अजितदादांना शरद पवारांशी समोरासमोर भेटण्याची हिंमत होईना अशी चर्चा आहे. घडलं असं की, कार्यक्रमाच्या स्टेजवर शरद पवार उभे होते. त्यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस स्टेजवर आले, पवारांना भेटून पुढे गेले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, पवारांशी हातात हात घेऊन भेटले. पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांसमोर येऊन त्यांना भेटले. मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा मात्र शरद पवारांची नजर चुकवून पवारांच्या मागच्या बाजूने स्टेजवर आले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतरही शरद पवारांची नजर चूकवून मागच्या बाजूनेच निघून गेल्याचे पाहायला मिळाले.

अजितदादांची ही कृती माध्यमांच्या कॅमेरामध्ये मात्र टिपल्यामुळे त्यावरुन जोरदार चर्चांना उधाण आले आहे. अजितदादांना शरद पवारांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नसल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या कार्यक्रमाला शरद पवारांच्या उपस्थितीवरुन जोरदार चर्चा सुरु झाल्या. मात्र आज शरद पवारांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांकडून शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पवार यांना भेटायला जाणार होते. मात्र शरद पवार कार्यक्रमाला जाण्यावर ठाम होते. दरम्यान, पवार यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते नाराज असल्याची माहिती समोर आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पवार यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.