पुणे: आणि वसंत मोरे यांनी मनसे कार्यालयात लावली हजेरी, सभासद नोंदणीला केली सुरवात
पुणे, २५ ऑगस्ट २०२२ : वसंत मोरे यांची मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर पुन्हा पक्ष करण्यात पाय ठेवणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. मात्र आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी सुरुवात होत असताना वसंत मोरे यांनी पक्ष काढण्यात हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या आग्रहाबद्दल मोरे यांना त्यांनीच दिलेल्या शब्दावरून पलटी मारायची वेळ आलेली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला आज पुण्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला माझी प्रथम सदस्य नोंदणी करून दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असे राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
येथील नवी पेठमधील मनसेच्या कार्यालयात आयोजित सदस्य नोदणी अभियान उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय भोसले, नगरसेवक वसंत मोरे आणि गणेश सातपुते यावेळी उपस्थित होते. पुणे मनसेच्यावतीने राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ऑपरेशन झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदा पुण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.
ठाकरे म्हणाले, “आत्तापर्यंत सदस्य नोंदणीची सुरवात मुंबईत करण्यात आली होती. यंदा प्रथमच ती पुण्यात करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दर तीन ते चार वर्षांनी नाव नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्वांना मी आव्हान करतो की, त्यांनी मनसेचे सदस्य व्हावे. जे सदस्य होतील त्यांना दर आठवड्याला पक्षाची माहिती, कार्यक्रम आणि विविध विषयांची माहिती त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल.