पडळकर, सातपुतेंना पवार गटाचे उत्तर: असली बारकी उंदीर साहेब नाश्त्याला खातात
माळशिरस, ११ डिसेंबर २०२४: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. हे गाव सध्या राजकीय घडमोडींचं केंद्र बनलं आहे. मॉक पोलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हे गाव चर्चेत आलं आहे. या गावात शरद पवार गेले होते. त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. यावेळी भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे. माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तमराव जानकर म्हणाले, असली बारकी- चिरकी ५ उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात. त्याच्या मागे कोण सगळ्यांना माहिती आहे. अेशी बारीक उंदरे जाऊन तिथं पवारसाहेबांवर टीका करतात. बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काय फरक पडत नाही.कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत. पवार साहेब पवार साहेब आहेत. त्यांनी भल्याभल्यांना लोळवलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील, असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
२०२९ ला भाजपचाच गुलाल उधळणार, असं राम सातपुते यांनी मारकडवाडीत बोलताना म्हटलं त्याला उत्तमराव जानकरांनी उत्तर दिलं आहे. राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावं. २०२९ कशाला गुलाल उधळायला मी महिना भरात संधी देतो. मंत्री होईल राज्यात त्यांचे सरकार आहे. मरतोय जगतोय २०२९ फार लांब… असे १०० राम सातपुते मोहिते पाटलांचे बुट पुसायला असतात. त्याने काय बऱळावं.. त्याचा तो स्तर आहे. तो वैफल्यग्रस्त आहे. तो मेंटल हॉस्पिटलमध्ये होता, असं म्हणत जानकरांनी राम सातपुतेंवर निशाणा साधला आहे.
पडळकर- खोत यांची पवारांवर टीका
महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. १०० शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात १०० गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले. बिनचिपळ्याचे नारदमुनी शरद पवारांनी आमच्या गावात येऊन आग लावण्याचा प्रयत्न केला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. तुमची पोरगी १ लाखाने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का? अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.