पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य – बावनकुळे मागणार अजित पवार यांची माफी
पुणे, २१ सप्टेंबर २०२३: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांचा ‘लबाड लांडगा’ असा उल्लेख केल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकर यांच्यावर टीका सुरू केली आहे. त्यावर आता भाजपने सारवारासव करत हे प्रकरण संपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “पडळकर यांचे वक्तव्य पक्षाच्या संस्कृतीस धरून नाही, त्यामुळे मी स्वतः अजित पवार यांची माफी मागणार आहे, असे स्पष्ट केले.
बावनकुळे हे आज पुण्या दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पडळकर प्रकरणावर भाष्य केले पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर पडळकर यांच्या तोंडाला काळे फासा आणि एक लाख रुपये मिळवा अशी घोषणाही नागपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षांनी केली आहे त्याचप्रमाणे अमोल मिटकरी यांनी देखील पडळकर यांच्यावर टीका केली थेट अजित पवार यांच्यावर टीका झाल्याने भाजपचे नेते बॅक फुटवर गेलेले आहेत ज्या तीन दिवसापासून या प्रकरणावर वाद सुरू असताना आता भाजपच्या वरिष्ठ नेते यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे.
बावनकुळे म्हणाले, “पडळकर यांचे वक्तव्य संस्कृतीला धरून नाही. असे कोणीही कधी बोलू नये, सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत टीका नको. अजित दादांनी त्यांना माफ करावे अशी विनंती करणार आहे.
पडळकर हे भाजपचे ते जबाबदार नेते आहेत, विधान परिषदेत आमदार आहेत. त्यांनी यापूर्वीही त्यांनी अनेकदा पवारांवर टीका केली, तेव्हाही देवेंद्र फडणवीस आणि मी सूचना दिली आहे. आता परत त्यांना व्यवस्थित बोलण्यास सांगू.