मराठा आरक्षणाला विरोध: गुणरत्न सदावर्ते त्यांची गाडी फोडली

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे दुसऱ्या टप्प्यातील अमरण उपोषण सुरू केले आहे. पुढार्‍यांना गाव बंदी करण्याचा निर्णय ही मराठा समाजाने घेतलेला आहे.‌असे असताना आरक्षण देणे संविधानाच्या चौकटीत बसत नाही असे सांगत त्यास विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची आज मुंबई येथे तोडफोड करण्यात आली.

मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले गुणरत्न सदावर्ते यांनी कायमच मराठा आंदोलनाला व आरक्षणाला विरोध करत ते न्यायालयामध्ये टिकू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ आणि सदावर्ते यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दोघांना शांत बसविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सदावर्ते हे कायमच मराठा आंदोलकांच्या टारगेटवर राहिलेले आहेत.

जरांगे पाटील यांनी शांतता आंदोलन करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलेले असले तरी आज मात्र सकाळी जरा पाटील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांना इशारा दिलेला आहे. त्यामुळे शांततेने आंदोलन सुरू असताना या कृतीने खळबळ उडालेली आहे.