महागाईला मोदी नाही तर आंतरराष्ट्रीय सिरीज जबाबदार – प्रकाश जावडेकर

पुणे, २ जून २०२३:पेट्रोल, गॅसचे दर आंतररीष्ट्रीय स्थितीमुळे वाढले असून याचा देशाच्या काही संबंध नाही. त्यामुळे ही महागाई वाढण्यास मोदी नाही तर आंतरराष्ट्रीय स्थिती जबाबदार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर बोलत होते. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी यावेळी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, मोदींमुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले, लोकांचा मोदींवर विश्वास असल्याने ती आमची मोठी ताकद आहे, या ताकदीवर पुन्हा सत्तेत येऊन २०२४ नंतर विकासाची गती आणखी वाढेल.
मोदींनी विकासाचे सकारात्मक राजकारण करत जात, धर्म, प्रांत, लिंग, यावर भेद केला नाही. स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. गेल्या ९ वर्षात देशातील दहशतवादी हल्ले थांबले, नक्षलवाद्यांचा ९० टक्के प्रभाव कमी झाला, शांतता निर्माण झाली आहे.
दरम्यान, गॅस पेट्रोल दरवाढीबाबत विचारले असता रशिया युक्रेन युद्धामुळे गॅस आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत.’’ असे जावडेकर यांनी सांगितले.

२०१४ पूर्वी भारत हा पहिल्या पाच कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत होता. पण आता भारत हा सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने अद्भुत यश मिळवले. जगात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार भारतात होतात, भीम, यूपीआय, को-विन ही ॲप जगभर सर्वोत्कृष्ट ठरली. जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. युरोपातील अनेक देशात मंदीचे सावट असताना भारताची वेगवान प्रगती चालू आहे. गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे, असा दावा जावडेकर यांनी केला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप