“नव्या संसद भवनाची इमारत बांधताना कोणालाही विश्वासात घेतले नाही” – पवारांचा मोदी सरकारवर आरोप

पुणे,२७ मे २०२३: नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाने उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत नव्या संशोधनाच्या भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत मोदींनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही अशी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राष्ट्रपती मुरमु यांच्या हस्ते भूमिपूजन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी करत मोदी सरकारवर टीका केलेली आहे तसेच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे त्याबाबत शरद पवार यांनी आज पुण्यात त्यांची भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, “अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता इमारत तयार झाली आहे.”
संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना ही विधीमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. “याचा अर्थ असा आहे, की निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम निर्णय आल्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होईल,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप