पुण्यात भाजपचा प्रयोग नाही: पुन्हा रासने, तापकीर, कांबळेना उमेदवारी जाहीर
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२४ ः भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवरांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी महायुतीमध्ये आघाडी घेत भाजपनं सर्वप्रथम विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये भाजपनं ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातून कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने, खडकवासला मतदारसंघातून आमदार भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट मधून आमदार सुनील कांबळे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जतमधून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून आतापर्यंत पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण १२१ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान दुसऱ्या यादीचं वैशिष्ट म्हणजे या यादीमध्ये पक्षाकडून मुंबईतील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.
भाजप मुंबईमध्ये एकूण आठरा जागा लढवणार आहे, त्यापैकी १४ जागांवर भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर अद्याप चार जगांवर कोणत्याही उमेदवराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. भाजपसोबतच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा केली.
भाजपची दुसरी यादी
राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती – मलकापूर
प्रकाश भारसाखळे – अकोट
विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
श्याम खोडे – वाशिम
केवलराम काळे – मेळघाट
मिलिंद नरोटे – गडचिरोली
देवराम भोंगले – राजुरा
कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
करण देवताळे – वरोरा
देवयानी फरांदे – नाशिक मध्य
हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
कुमार आयलानी – उल्हासनगर
रवींद्र पाटील – पेण
भीमराव तापकीर – खडकवासला
सुनील कांबळे – पुणे छावणी
हेमंत रासने – कस्बापेठ
रमेश कराड – लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
समाधान आवताडे – पंढरपूर
सत्यजित देशमुख – शिराळा
गोपीचंद पडळकर – जत