निर्मला सीतारामन यांच्या फोटोला काळे फासले

पुणे, २३ सप्टेंबर २०२२: बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पोस्टरला कोणीतरी काळे फासण्याचा प्रकार धनकवडी येथे घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपने सुरू केलेल्या मोहिमेमुळे हा दौरा चर्चेत असताना ही घटना घडली आहे.

धनकवडी हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचे निवासस्थान याच भागात आहे. निर्मला सीतारामन या तापकीर यांच्या घरी गुरुवारी मुक्कामी होत्या. त्यामुळे भागात त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी लावण्यात आलेला होत्या. त्यावर निर्मला सीतारामन इतर भाजप नेत्यांची फोटो होते. त्यापैकी शिवछत्रपती सभागृह येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागत कमानीवरील फोटोला काळे फासले आहे.
नेमके हे काळे फासण्याचे कृत्य कोणी केले हे अद्याप ही कळले नाही. हा सर्व प्रकार काही अज्ञातांनी शुक्रवारी रात्री केल्याची शक्यता आहे.
दरम्यान सितारामन यांच्या या दौऱ्यास आम आदमी पक्षाने विरोध केला वारजे येथे सितारामन यांचा तफा जात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला तसेच काळे झेंडे दाखविण्यात आले त्यानंतर आता हा दुसरा प्रकार समोर आलेला आहे.