राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालाचे प्रतिकात्मक धोतर फेडले

पुणे, २१ नोव्हेंबर २०२२ः राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात सावरकर पुतळा सारसबाग येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलन करताना राज्यपालांच्या पुतळ्याचे धोतर फेडले.

या आंदोलनात यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचा जयजयकार करण्यात आला ”, “भगतसिंग कोशियारी
नही चलेंगी होषीयारी”, “काळी टोपी
“काळे मन हेच भाजप चे अंतरमन”,
“भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो” ,
“सुधांशु त्रिवेदीचा धिक्कार असो “अश्या धोषणा देण्यात आल्या.

“राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना यांबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र व महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत
आहेत. यातून त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा ते राबवित आहे. किंबहुना ते महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत आहेत. ” ते पुढे म्हणाले की, “राज्यपाल महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत आहेत व त्याला भाजप प्रोत्साहन देत आहेत.” अशी टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी ओरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे नीच व अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. सत्तेसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे.शिवरायांचा अवमान ही भाजपाची मॅच फिक्सिंग असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला.‌

सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे ,प्रिया गदादे , किशोर कांबळे , वनराज आंदेकर , महेश शिंदे ,बाबा पटील , मुणालीनी वाणी, श्वेता होनराव , पार्थ मिठकरी , गणेश मोहीते, मनाली भिलारे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.