राहूल गांधीनी माफी मागावी म्हणणाऱ्या आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी

मुंबई, २४ मे २०२३ ः मोदी समाजावर टीका केल्याने उच्च न्यायालयाने काँग्रसेचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असताना काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांची काँग्रेसमधून हकालपद्दी करण्यात आली आली आहे

शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला ९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.”

“आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप