एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी भरला उमेदवारी अर्ज.
पुणे, २५ एप्रिल २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोठा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर दुसरीकडे एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी देखील आपलं उमेदवारी अर्ज हे भरला आहे.
पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर,महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे,आणि एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांच्यात लढत होणार आहे.एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांना भाजपने मतांचं विभाजन करण्यासाठी उमेदवारी दिली असल्याची टीका होऊ लागली होती. एकूणच पुण्याचे प्रश्न,एमआयएम वर होत असलेली टीका यावर एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अनिस सुंडके म्हणाले, “मी निवडणुकीला उभा राहिलो की समोरचे धास्ती घेतातच त्यात काही विषय नाही. त्यामुळेच काँग्रेसवाले एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून प्रचार करत आहेत. काँग्रेसपेक्षा एमआयएम मुस्लिमांचे प्रश्न दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रभागी राहिलेली आहे. माझ्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी, वरीस पठाण यासह एमआयएमचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.