नीलम गोर्हे यांच्या विरोधात विरोधी सदस्यांचा प्रचंड गोंधळ
मुंबई, १८ जुलै २०२३ : नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप नियपायमल्ली करणाऱ्या उपसभापतींचा निषेध असो’, अशी घोषणाबाजी करत विधानपरिषदेत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. उपसभापती नीलम गो-हे यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारल्याने सभात्याग केला.
त्यावर ‘मी लोकशाहीवादी आहे. नियमानुसार गटनेत्यांच्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहून याविषयावर बोलण्याची परवानगी मागितली असती कामकाज तर माझ्या अधिकारात ती परवानगी मी दिली असती’ असे स्पष्टीकरण देत विधानपरिषदच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज गोंधळातच रेटले. विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाले. मात्र शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतिपदावरच आक्षेप घेतला. उपसभापतिपदाच्या खुर्चीवर बसल्यावर पक्षसदस्यत्व आपोआप संपत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्यांना बोलण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने विरोधकांनी घोषणाबाजी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी ‘आमचे म्हणणे तरी ऐकून घ्या’ अशी मागणी केली. मात्र, त्यांना बोलण्यास परवानगी न मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात ‘नियमांची पायमल्ली करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांच्या सुरु असलेल्या गोंधळावर जोरदार आक्षेप घेतला. उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणायचा असेल तर अगोदर सूचना द्यावी लागते, असे ठणकावले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही हा मुद्दा गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित
राहून का मांडला नाही. मी माझ्या अधिकारात ही परवानगी दिली असती. नियमानुसार शोकप्रस्तावानंतर स्थगन घेता येत नसल्याचे सांगत गोऱ्हे यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. डॉ. माणिकराव मंगुडकर, प्रभाकर दलाल या माजी विधानपरिषद सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘गोऱ्हे यांना उपसभापतिपदावरून हटवा’ विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सभागृहात गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटविण्यासोबत, त्यांच्या
अपात्रतेची जोरदार मागणी केली. विरोधी पक्षांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतही नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. ठाकरे गटाने विधान परिषदेच्या सचिवांकडे केली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर
केल्यामुळे त्या घटनात्मक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह मनीषा कायंदे, विप्लव. बजोरिया यांनी पक्षांतर केले असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जावी, अशी मागणी शिवसेनेच्या अनिल परब म्हणाले, की गोन्हे यांनी स्वतःहून पक्षाचे सदस्यत्व सोडलेलं आहे. दहाव्या परिशिष्टातील कायद्याच्या २ अ मध्ये अपात्रतेच्या तरतुदीअंतर्गत त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली.