एकनाथ शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करतात -भाजपमध्ये प्रवेश करताच आशिष देशमुखांचे वक्तव्य

नागपूर, १८ जून २०२३ : देवेंद्र फडणवीस यांचे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. स्वतः अजित पवार यांनीही जाहिरात वादात फडणवीस यांचे कौतुक केले असे त्यांचे विलक्षण व्यक्तीमत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहेत, असे वक्तव्य आशिष देशमुख यांनी केले. ते नागपुरात बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर नाही तर तलवार खुपसली होती, असा टोलाही यावेळी त्यांनी ठाकरेंना लगावला.

माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज नागपूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नागपूरच्या कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात कार्यक्रम पार पडला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख यांनी काँग्रेसवर सडेतोड टीकास्त्र सोडले. काँग्रेस आता म्हातारी झाली आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी पक्ष सोडताना केली.
नाना पटोले यांच्या वागण्यात अविर्भाव आहे. नाना पटोले यांच्याकडे आपण बघितलं तर ते दुसरीकडे बघतात. काँग्रेस प्रदेशाध्यशाचा एक तर कार्यकर्त्यांना फोन येत नाही व आपण फोन केला तर नाना पटोलेंचा फोन लागत नाही. राहुल गांधी ओबीसीद्रोही आहेत. राहुल गांधी यांनी राफेल व चौकीदार चोर आहे. या विषयावर बिनशर्त माफी मागितली तर  ओबीसी बद्दल अनवधानाने काही बोलले तर माफी मागावी अशीच माझी भूमिका होती. मात्र मला काँग्रेसने बरखास्त केले, असा आरोप यावेळी देशमुख यांनी लगावला. २०२४मध्ये मी विधानसभा व लोकसभेची निवडणूक लढणार नाही. काटोल मधील काकागिरी, सावनेर मधील दादागिरी व विदर्भातील नानागिरी मला भाजपमध्ये राहून संपवायची आहे. मला आमदारकीसाठी एक मतदार संघात अडकून देण्यापेक्षा मी २० ते २५ जणांना निवडून आण्यासाठी मला व्यापम भूमिका पक्षात द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी पक्षप्रवेशाच्या वेळेस केली.

नाना पाटोले व नितीन राऊत यांना माझ्या घरून तिकीट दिल्याने आमदार झाले. माझे वडील रणजित देशमुख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना काँग्रेसची तिकीट देण्यात आली होती, त्यामुळे मला आमदारकीचा रस नाही. माझ्या कुटुंबात अनेकांनी आमदारकी भोगली आहे, असे देशमुख म्हणाले.