धंगेकरांचे मनसेच्या कार्यालयात आधी स्वागत आणि नंतर सर्वसाधारण
पुणे, १७ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे काल गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याने जंगी स्वागत केले. त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. एकीकडे मनसेने भाजपला पाठिंबा दिला असताना दुसरीकडे शहर कार्यालयात झालेले स्वागतामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी पत्रक काढून हे स्वागत योगायोगाने झालेली आहे अशी सारवासारव केलेली आहे.
रवींद्र धंगेकर हे पूर्वीचे मनसेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मनसेकडून दोन वेळा कसब्याची विधानसभा निवडणूक लढवली आहे. तसेच ते नगरसेवक देखील राहिलेले आहेत. त्यामुळे मनसेमध्ये त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार नसल्याने हे कार्यकर्ते धंगेकर यांचा उघडपणे प्रचारक करत होते. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा आहे त्याची जाहीर केल्यानंतर त्यांची कोंडी झालेली आहे. भाजपला पाठिंबा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सहकार्यालयात धंगेकर यांचे स्वागत झाल्याने त्याची राजकीय पडसाद उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खैरे यांनी पत्र काढले आहे.
काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक
चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे 2 मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.
राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीचकसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये, असे योगेश खैरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप