कसब्याच्या प्रचारात आणखी एक वयोवृद्ध नेता; शरद पवार घेणार सभा

पुणे, १७ फेब्रुवारी २०२३  : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसब्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांना प्रचारात उतरवले. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. २२फेब्रुवारी त्यांची सभा होण्याची शक्यता आहे भाजपाने काँग्रेसकडून तरुण उमेदवार निवडणुकीत उतरली असली तरी त्यांच्या प्रचारासाठी वयोवृद्धीने त्यांना येण्याची नामुष्की ओढावत आहे

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत होत असून या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. ही निवडणुक चुरशीची होणार असून भाजप आणि मविआने प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅलीचे आयोजन केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देखील कसबा आणि चिचंवडच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, आज सकाळी रविंद्र धंगेकर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार साहेबांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने निवडणुकीत मला विजयाची पूर्ण खात्री आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एकदिलाने काम करत संपूर्ण यंत्रणा माझ्या पाठीशी उभी केली असल्याने आपला विजय हा निश्चित असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नेते अंकुश काकडे व विठ्ठलशेठ मणियार हे देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत प्रचारासाठी उतरणार आहेत.
कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांची सभा येत्या २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत होणार आहे. या दोन्ही ठिकाणी शरद पवार सभा घेणार आहेत. यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरिश बापट यांना कसब्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाते. तर शरद पवारांना निवडणुकीतील गेमचेंजर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.