“निवडणूक आली की पवार साहेबांना ट्रेंड बदलायची स्वप्न पडतात” – देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्यावर टीका

मुंबई, ७ जून २०२३: ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न पाहिलं. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. तसंच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

“देशात सध्या भाजपाविरोधी वातावरण आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे तो भाजपा विरोधी आहे. त्यामुळे असाच ट्रेंड कायम राहिला तर २०२४ मध्ये देशाचं चित्र बदलेलं दिसेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
याचविषयी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता निवडणुका आल्या की शरद पवार काय बोलतात ते डायलॉग्ज आम्हाला पाठ झाले आहेत असा टोला लगावला आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न पाहिलं. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. तसंच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे म्हणत आहेत कुठे आहे मोदीविरोधी वातावरण? ३०० पेक्षा जास्त लोक निवडणून आले तरीही मोदीविरोधी वातावरण दिसतं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बोलत आहेत. “
तुम्हाला आत्तापर्यंतचा इतिहास माहित आहेच की शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं. आत्ता ते देशात मोदीविरोधी वातावरण आहे म्हणत आहेत.” असं हसत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई विमातळाच्या कामाची हवाई पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ लवकरच लोकांसाठी खुला होईल या दृष्टीने आमचं काम सुरु आहे अशीही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप