माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी

मुंबई, १० फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना थेट व्यासपीठावरूनच धमकी दिली आहे. ते म्हणाले की, माझ्यावर टीका करतो त्यामुळे एक दिवस मी त्याला चोप नक्की देणार सोडणार नाही. त्याला मी असं सोडत नाही.
राणे म्हणाले की, कुणीतरी भाडोत्री भास्कर आणतात आणि सांगतात बोला राणेंविरुद्ध. ते काहीही बोलतील मी काय त्याला उत्तर देणार आहे का? मात्र एक दिवस चोप नक्की देणार. सोडणार नाही त्याला. मी असं सोडत नाही. तसेच त्याने निवडणुकीमध्ये प्रचारासाठी माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले अद्यापही ते परत केलेले नाहीत. तसेच त्याला तिकीटही मीच दिलं.

बाळासाहेबांना सांगून खेडेकरला बाद करून भास्कर जाधवला तिकीट दिलं. त्यानंतर तो माझ्या घरी आला आणि म्हणाला साहेब प्रचाराला पैसे नाही. त्यावेळी एकदा दहा लाख आणि एकदा पाच लाख असे पंधरा लाख मी त्याला दिले. अद्याप पर्यंत ते पैसे परत दिलेले नाही आणि वरून माझ्यावरती ते टीका करतात. असे अनेक जण आहेत. पण मला काही फरक पडत नाही. मी समर्थ आहे. उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवायला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पार पडलेल्या सभेमध्ये भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर जरी टीका केली होती. जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो. शिवाय जाधवांनी प्राण्यांचे नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. तर उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा. असेही भास्कर जाधव या भाषणात म्हणाले होते. त्यावरूनच नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांवर जोरदार हल्लाबोल केला.