“भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का?” देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२३ ः महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’च्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत विधानसभा अध्यक्षांबद्दल वक्तव्य केले. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा आरोप केला.

आज सोमवारपासून मुंबईत येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला. यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक होत “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही.”असा इशारा दिला.
“हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप