भाजपकडून शिंदे गटाला सापत्न वागणूक – गजानन किर्तीकर
मुंबई, २६ मे २०२३: राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. त्यातच या राज्य सरकारवर पूर्णपणे भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे याचा शिंदे गटातील खडखड देण्यास सुरुवात झालेली आहे. ठाकरे गटाशी गद्दारी करून शिंदे गटात आलेले खासदार गजानन किर्तीकर यांनी आज भाजपवर तोफ डागली. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला.
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे.
गजानन कीर्तिकर म्हणाले, “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे.”
शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र डागलं आहे. “फडफड करणाऱ्या कोंबड्यांच्या मानेवर भाजपा एकदाच सुरी फिरवेल. त्यांना लोकसभेला २२ नाहीतर ५ जागा जरी भेटल्या तरी खूप आहे. आम्ही मागील वेळी १९ जागांवर विजयी झालो होतो, आताही १९ जागांवर विजयी होणार आहे,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप