भाजपने राज्यात लढवाव्यात ३० जागा! लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वेक्षण संस्थांचा अहवाल
मुंबई, ५ डिसेंबर २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तीन राज्यांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानेनलोकसभेच्या ४८ पैकी किमान ३० जागा
लढविणे योग्य ठरेल, असा अहवाल सर्वेक्षण संस्थांनी दिल्याचे समजते. आदिवासी भागातील पालघर आणि ठाणे, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर हे आधी युतीत भाजपकडे नसलेले मतदारसंघ भाजपने लढणे श्रेयस्कर ठरेल, असे या सर्वेक्षणात आढळले आहे.
यातील शिंदे गटाकडील मुंबईतील दोन्ही मतदारसंघ भाजपने लढवायचे ठरवले तर शिवसेनेचे शक्तिस्थळ असलेल्या मुंबईत ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच मैदानात नसेल. मात्र, धनुष्यबाणनचिन्हच मैदानात नसल्याचा फटका तर बसणार नाहीना, याचा विचार भाजप आणि शिंदेसेना एकत्र बसून करणार आहेत. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यांना न दुखावता ठाण्याचा प्रश्न सोडवला जाईल, असे या संदर्भात एका ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.
महानगरांत भाजपला मोठा प्रतिसाद असून, अशा सर्व मतदारसंघांत कमळ हेच चिन्ह प्रभावी ठरेल, असेही निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. शिंदे गटाचे काही उमेदवार बदलावेत, असे यापूर्वीच भाजपने सुचविले होते. आता हा आग्रह पुढे रेटला जाऊ शकतो. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, मध्य प्रदेश
आणि छत्तीसगड ही तीन राज्ये महाराष्ट्र शासनाच्या वतान उभारण्यात जिंकल्यानंतर देशात भाजपच्या लोकसभेच्या किमान २५० लढती विजयी टप्प्यात पोहोचतील, असे भाकीत केले गेले. महाराष्ट्रातील बारामती, चंद्रपूर, सांगली या भाजप लढवत असलेल्या जागा या विजयानंतरही जिंकणे सोपे नाही. महानगरे आणि आदिवासी भागात कमळलाट असल्यास राजेंद्र गावित (पालघर) आणि राहुल शेवाळे (मध्य मुंबई) यांच्या जागा कमळावर लढविल्या जाऊ शकतात. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि गजानन कीर्तिकर यांचा मुंबईतील मतदारसंघ येथे बदल करावा, अशी शिफारस या अहवालात आहे.
भाजपमध्ये नवे प्रवेश ?
भाजपच्या ताज्या यशामुळे कुंपणावरचे काही नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. यात काही बड्या काँग्रेस नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. मुंबईत ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक शिंदे गटात जायचे की भाजपमध्ये, याचा हिशेब मांडत आहेत. मात्र, ज्यांच्यावर गेल्या निवडणुकीत टीका केली. त्यांना पक्षात घेणे कितपत उचित ठरेल, असा प्रश्न भाजपसमोर आहे.