कोनशिलेत नाव नसल्याने भाजप आमदाराला आला राग ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या लावली कानशीलाता
पुणे, ५ जानेवारी २०२३: भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आले आहे. जितेंद्र सुरेश सातव या राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुखाला मारहाण करण्यात करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एका उद्घाटन कार्यक्रमावेळी अजित पवार यांच्यासमोरच हा प्रसंग घडला आहे.
ससून रुग्णालयात उद्घाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त झाले, त्यांना राग अनावर आला. याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समजतेय. दरम्यान, याबाबत जितेंद्र सातव यांना विचारण्यात आले, त्यावर ते त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले.
पोलिस शिपायाच्याही कानशीलात लगावली
बी. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे पुणे कँटोन्मेंट आमदार सुनील कांबळे यांनी पोलिस शिपायाला कानशिलात लगावली. स्थानिक आमदार असून नाव नसल्यानं ते संतप्त झाले होते. ही दुसरी घटना असून पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांच्या देखील कानशिलात लगावली होती.
नेमका काय प्रकार घडला आहे ?
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या आदाराने कानशीलात लगावली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले.त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आलेय.
अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली. पुण्यातील ससुन रुग्णालयात हा प्रकार घडलाय. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयाच्या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे म्हणत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ अस म्हटलंय.