रोहित पवार यांच्यावर भुजबळांचे कार्यकर्ते संतापले, म्हणाले काल आलेल्या पोराने जास्त बोलू नये

पुणे, १ डिसेंंबर २०२२ः  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी काल सरस्वतीदेवीने किती शाळा काढल्या असा सवाल उपस्थित केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यावर विरोधकांसह पक्षातील आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत तुम्ही काळजीपूर्वक बोला असा सल्ला दिला. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने नाराजी झालेल्या राजकीय मंडळीनंतर आता रोहित पवारांनी छगन भुजबळांना सल्ला दिल्याने भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

त्यामुळे त्यांनी थेट पक्षासह आमदार रोहित पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सरस्वतीच्या वक्तव्यानंतर विरोधकांसह पक्षातील नेत्यांनी त्यांना सुनावल्यानंतर आता छगन भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी थेट, आम्ही पक्षाचे नाही, साहेबांचे समर्थक आहे अशा शब्दात राष्ट्रावादीला आणि रोहित पवार यांना सुनावण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती सपना माळी शिवणकर यांनी छगन भुजबळ यांना रोहित पवार यांनी तु्म्ही काळजीपूर्वक बोला असा सल्ला दिल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार रोहित पवारांचा निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे काल आलेल्या पोरांनी, तुम्ही काळजीपूर्वक बोला हे सांगणं चुकीचं असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्यावरूनच आम्ही रोहित पवार यांना समज आणि विनंती करतोय असंही त्यांना सुनावण्यात आले आहे.

आमदार छगन भुजबळ काय चुकीचं बोलत असतील तर ते तुम्ही सिद्ध करा असा टोलाही रोहित पवार यांना त्यांनी लगावला आहे.

यावेळी सपना माळी शिवणकर यांनी त्यांना सांगितले की, स्वतःला तुम्ही पुरोगामी समजत असाल तर आधी अभ्यास करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

छगन भुजबळ हे महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी समता परिषद घेतात. त्यामुळे त्यांनी मांडलेला विचार हा राष्ट्रावादी पक्षाच्या स्टेजवरून सांगितले नाही तर त्यांनी समता परिषदेतून आपले विचार व्यक्त केले आहेत असा जोरदार टोलाही सपना माळी शिवणकर यांनी त्यांना लगावला आहे.

छगन भुजबळ यांना तुम्ही जर विचारपूर्वक बोला अशा सूचना देत असालतर रोहित पवार तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं विचार मांडता. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असंही त्यांना यावेळी सांगितले.