“भगतसिंह कोश्यारी थर्डक्लास, त्यांना वृद्धाश्रमात पाठवा”, उदयनराजे भोसले यांची संतप्त प्रतिक्रिया
सातारा, २१ नोव्हेंबर २०२२ ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हेदेखील आक्रमक झाले आहेत. कोश्यारी यांचे वय झालेले आहे. आपण काय बोलत आहोत, हे त्यांना समजत नाही. राज्यपालांना कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“विकृतीला कुठलाही पक्ष नसतो, कुठलीही जात नसते. अशा विकृत लोकांना पक्षांनी फेकून दिलं पाहिजे. राज्यपालांना तर अगोदर खाली खेचून कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे. याबाबत लवकरच मी माझी पुढची वाटचाल ठरवणार आहे,” अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातून बाहेर काढले पाहिजे. ते खूप दिवसांपासून त्या घरात बसून आहेत. त्यांची तेथे बसण्याची लायकी नाही. ते काहीही बोलत आहेत. राज्यपाल थर्डक्लास आहेत. राज्यपालांची आता हकालपट्टी करावी. त्यांचे वय झाले आहे. त्यांना आपण काय बोलत आहोत, हे समजत नाही. त्यांना विस्मरण होतंय. त्यांना वृद्धाश्रमात पाठवा,” असेही उदयनराजे भोसले म्हणाले.