अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पुन्हा एकदा चर्चेत; अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक दावा

मुंबई, २४ आॅक्टोबर २०२२: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक याना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. सुरुवातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. दोन्ही गटांकडून एकोंमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर भाजपाने या निवडणुकीतून अचानक माघार घेतली. आता पुन्हा एकदा ही पोटनिवडणूक चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. या पोटनिवडणुकीसाठी उभा राहिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मिलिंद कांबळे असं या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे.  पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आपल्यावर वीस ते पंचवीस जणांच्या गटाने दबाव टाकल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

कांबळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर

दरम्यान मिलिंद कांबळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर गेले होते. मात्र त्यांची अपॉईंटमेंट नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही.

कांबळेंचा नेमका दावा काय?

मिलिंद कांबळे यांनी धक्कादायक दावा केला आहे.  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपण अपक्ष म्हणून उभे आहोत. 17 ऑक्टोबर 2022 ही निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी 20 ते 25 जणाच्या गटाने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. तसेच आपण उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. मात्र उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे आता तू मतदारसंघात प्रचार कसा करतो ते आम्ही पहातोच अशी धमकी दिल्याचा आरोपही कांबळे यांनी केला आहे.  अपक्ष उमेदवाराला निवडणूक लाढवता आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.