उमेदवार वरून भांडत तर कानाखाली जाळ काढीन, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना फटकावलं
पुणे, ५ जून २०२३ : आपल्या आक्रमक व खास शैलीतील वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कायमच चर्चेत आणि वादात अडकलेले असतात. त्याचा आज पुन्हा एकदा प्रत्यय कार्यकर्त्यांना आला. लोकसभा जागावाटपाच्या संदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी तिकीटावरुन वाद नको, त्यावरुन भांडलात तर याद राखा, कानाखाली आवाज काढेल,” अशा शब्दात कार्यकर्त्यांना खडसावलं.
आगामी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बैठकांच्या सत्र सुरु झाले आहे. पुण्यात आज आठ लोकसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरु आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून लढवण्यात येत असलेल्या शिरुर, भिवंडी, जालना आढावा घेतला जाणार आहे. या मतदारसंघातील पक्षाचे आजी, माजी आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छूक या बैठकीला उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत.
विरोधीपक्ष अजित पवार यांनी आजच्या बैठकीत कार्यक्रर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. बैठकीत अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला. ” उमेदवारीच्या तिकीटावरुन वाद नको, त्यावरुन भांडलात तर याद राखा..कानाखाली आवाज काढेल,” अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं. महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर मविआची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीची पुण्यात बैठक होत आहे.