राउतांच्या अटकेनंतर चालकाने पेढे वाटले

दिल्ली , ०२/०८/२०२२: शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने दिल्लीत पेढे वाटून आनंद साजरा केला.

 

खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. प्रकाश राजपूत असे वाहन चालकाचे नाव आहे. १९९३ ते २००० या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम केले आहे.

 

प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत पुष्पगुच्छ दिले. यानंतर संजय राऊतांच्या अटकेवर बोलताना राजपुतांनी आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केल्याचा आरोप करत आता राऊत २०२४ पर्यंत तुरुंगातून बाहेर निघायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे प्रकाश राजपूत म्हणाले, ‘संजय राऊत जेलमध्ये गेले त्याबद्दल मी खूप खुश आहे.

 

राऊतांनी चुकीची कामे करीत शिवसेना संपवली. आता २०२४ पर्यंत ते तुरुंगाबाहेर निघायला नको. असेही त्यांनी सांगितले ‘मी १९९३ ते २००० या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर चालक होतो,’ हे राजपूत यांनी नमूद केले.