आबा बागुल भाजपच्या वाटेवर; फडणवीसांची घेतली भेट
पुणे, १५ एप्रिल २०२४ : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आबा बागुल हे काँग्रेस पक्षांमध्ये नाराज असताना त्यांनी आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे बागुल हे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र बागुल यांना अद्याप भाजपकडून ठोस आश्वासन दिलेले नसल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडलेला आहे.
पुणे लोकसभा निवडणूक काँग्रेस कडून लढविण्यासाठी आबा बागुल हे इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांच्या ऐवजी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. यांची घोषणा झाल्यानंतर आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली होती, तसेच काँग्रेस भावना त्यांनी त्यांच्या समर्थकांसह आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रभारी चेन्नीथेला यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. काँग्रेस भावनाच होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकांना आबा बागुल हे अनुउपस्थित राहत आहेत. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेला नाही.
पुणे महापालिकेत पाच वेळा नगरसेवक झालेले बागूल हे उपमहापौर विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांची वरिष्ठता लक्षात घेऊन संधी द्यावी अशी त्यांची मागणी होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी यांनी सहकार नगर येथील फडणवीस यांच्या भावाच्या घरी देखील फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आबा बागुल काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती मात्र आता त्यास पुष्टी मिळालेली आहे.
आबा बागुल यांनी नागपूर येथे फडणीस यांच्या घरी भेट घेतली. फडणवीस आणि त्यांच्यामध्ये सांता पाच ते दहा मिनिटे चर्चा झाली. यामध्ये पुणे लोकसभेच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली, तसेच आबा बघून यांनी त्यांची इच्छा व्यक्त करत भाजपमध्ये येण्याची संकेत फडणवीस यांना दिले. त्याचवेळी भाजपकडून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न बागुल यांच्याकडे सुरू आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप प्रवेशाची तारीख निश्चित केलेली नाही. ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रेरित्व करणारे अबाउत हे भाजपच्या वाटेवर असल्याने रवींद्र धंगेकर यांना जोरदार झटका बसण्याची शक्यत आहे.