पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’

पिंपरी, ९ जानेवारी २०२३ : मोफत पाणी, शिक्षण आणि वीज हे मुद्दे घेऊन पक्षाने दिल्ली महापालिकेत सत्ता काबीज केली तसेच गुजरात मध्ये देखील चांगले मताधन मिळवले आम आदमी पक्षाची आता नजर पुणे सह पिंपरी चिंचवड महापालिकेवर वळली असून पिंपरी चिंचवड मधील सर्व जागा ताकदीने लढणार असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘आप’चे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड तुमच्या सह जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत यावेळी उपस्थित होते.
राठोड म्हणाले,”आगामी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीत ‘आम आदमी पार्टी ‘ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मोफत पाणी, शिक्षण आणि वीज हे मुद्दे घेऊन निवडणूक लढणार असल्याची माहिती ‘आप’चे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. युतीत राहण्यापेक्षा आम्हाला स्वतंत्र लढणं आवडेल, आपापसात भांडण करणाऱ्यांसोबत आम्हाला जायचं नाही असं राठोड यांनी सांगितलं.

पंजाब आणि दिल्लीत सत्ताधारी असणाऱ्या आप पक्षाने आता राज्यात पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेवरही लक्ष केंद्रित केले आहे. मोफत पाणी, वीज, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्याचा मुद्दा घेऊन आप पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून आपलं नशीब अजमावणार आहे. पिंपरी- चिंचवडकरांना भेडवसावणाऱ्या समस्यांचा आपने मुद्दा बनवला आहे. त्यात रेड झोन आणि शास्तीकराचा समावेश आहे. ” एकेकाळी श्रीमंत महानगर पालिका म्हणून पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेला ओळखलं जायचं, मग, मोफत आरोग्य सुविधा का दिल्या जात नाहीत ” असा प्रश्न राठोड यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष बलाढ्य आहेत. मात्र, जनताच कौल कोणाला द्यायचा हे ठरवत असते. त्यामुळं आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आम्हाला युतीवर विश्वास नाही. आपापसात भांडण करणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला जायचं नाही अशी भूमिका आम आदमी पार्टीने घेतली आहे.